Vasantrao Naik Janm Shatabdi

(0 User reviews)   106
By Krishna Admin Posted on Mar 5, 2026
In Category - Magazines
Pramod T. Nalawade 2012
76 Marathi
वसंतराव नाईक जन्म शताब्दी (वसंतराव नाईक यांच्या ५३ व्या जन्मदिनानिमित्त काढण्यात आलेल्या गौरव ग्रंथातून साभार)

वसंतराव नाईक यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी बहुजन समाजाशी समरस होऊन कार्य करण्यामध्ये आपले उभे आयुष्य घातले आहे. हे मी अनेक वर्ष त्यांच्या घराण्यापासून पहात आहे.

मागासलेला समाज शिक्षणाशिवाय उन्नत होणे शक्य नाही हे त्यांचे वडील अत्यंत वृद्धापकाली सुद्धा माझ्या जवळ डोळ्यांत पाणी आणून सांगताना मी पाहिले आहे. गरीब मजुरापासून ते सुशिक्षित माणसापर्यंत मित्रत्त्वाच्या नात्यांनी वागताना मी अनेकदा त्यांना पाहिले आहे.


आपल्या मुख्यमंत्री पदावरून वागताना त्यांच्या स्वभावात थोडाही फरक झालेला मला आढळलेला नाही. त्यांचे चिंतन देशाच्या नवनिर्मितीकडे व लक्ष मजदूर व गरीब शेतकरी उन्नत होतील ह्याकडेच असते. ही विदर्भाची मायभूमी अशा अनेक रत्नांना प्रसवली आहे. त्याच इतिहासाची साक्ष पटविण्यासाठी स्वर्गीय श्री.कन्नमवारांनंतर त्यांनीही लोकजनमनावर आपला वारसा उत्तम तऱ्हेने चालविला आहे.


त्याही पुढे या विशाल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे जीवन देशव्यापी होवो अशी त्यांच्या गौरवपत्रिकेला माझी शुभकामना आहे.


- तुकड्यादास

There are no reviews for this eBook.

0
0 out of 5 (0 User reviews )

Add a Review

Your Rating *
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in

Related eBooks