Samanyantil Asamanya (सामान्यांतील असामान्य)

(0 User reviews)   219
Shri Panditrao Savji Patil 1975
सामान्यांतील असामान्य, वसंतराव नाईक
217 मराठी
श्री पंडितराव सावजी पाटील यांनी लिहिलेले "सामान्यांतिल असामन्य" हे मराठी चरित्र वाचा. वसंतराव नाईक यांचे जीवन, नेतृत्व आणि वारसा यांचा हा एक मौल्यवान वृत्तांत आहे.

निवेदन

मी लेखक नाही आणि यापूर्वी प्रकाशनार्थी कोणतेही लिखाण केलेले नाही. श्री. वसंतरावजी नाईक यांचे एक छोटेखानी तरी चरित्र आपल्या हातून लिहून व्हावे अशी फार दिवसांधी—अगदी श्री. वसंतरावजी मुख्यमंत्री असताना पासूनची—आस होती. पण माझ्या नवरूपाला हे साध्य कसे होणार ही भीतीही होतीच. आज हे छोटेखानी चरित्र सिद्ध झाले आहे. त्यांत माझी शिस्तरी म्हणजे फक्त माझी लिखाणाची दुर्दम्य इच्छा. माझ्या लेखणीत स्फुरण मात्र केले आहे श्री. वसंतरावजींच्या सद्गुणांनी व थोरवीने. म्हणजे “लिहविता धनी वेगळाची” असाच येथे प्रकार आहे.

भारतीय श्री. वसंतरावजी नाईक यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला आहे. विदर्भातील बंजारा समाजाच्या अत्यंत मागासलेल्या समाजात जन्माला येऊन महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध पदांवर आणि मुख्यतः महाराष्ट्राचे सलग मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी केलेल्या भरीव कार्यांनी जागृत सर्वसामान्य जनतेस व विद्यार्थी वर्गास व्हावी या उद्देशानेच हे त्यांच्या जीवनचरित्राचे कार्य मी हाती घेतले.


या पुस्तकासाठी श्री. वसंतरावजींच्या चरित्रावर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथ, महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होणारे “लोकराज्य” व दैनिक वृत्तपत्रात वेळोवेळी प्रसिद्ध झालेली चरित्रात्मक भाषणे उपलब्ध झाल्यामुळे हे पुस्तक मी पूर्ण करू शकलो. पुस्तकासाठी जमविलेल्या साधन-सामग्रीत चरित्रनायकाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील कार्याचे महत्त्वाचेच प्रसंग थोडक्यात रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या जीवनचरित्राची प्रसंगानुसार माहिती कालानुक्रमे दिली आहे.

भारतातील प्रख्यात पंडित व थोर विचारवंत आदरणीय तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून, पुस्तक काळजीपूर्वक वाचून सुंदर व विचारप्रवर्तक प्रस्तावना लिहून श्री. वसंतरावजींची गौरव केली आणि या पुस्तकास आशीर्वाद दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.

तसेच, पुस्तक तयार होत असताना माझे हितचिंतक श्री. बा. दे. मुंढेकर, वेळोवेळी माजी आमदार व महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष यांनी आपुलकीने तपासले व मौलिक सूचना केल्या. त्याबद्दल मी त्यांची फार ऋणी आहे.

श्री. द. य. राजाध्यक्ष, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ हे माझे मार्गदर्शक—केवळ लिखाणापुरतेच नव्हे, त्यांच्या अनेक वर्षांच्या सहवासातून आयुष्यभर संगत करतील असे संस्कार घडले आहेत.


चरित्रासाठी मी साधने गोळा करीत असताना श्री. सुधाकर सावे व श्रीमती शिरपा ज्ञानविस्तार यांनी मदत केली. तसेच माझे स्नेही श्री. राम कोहेडकर यांनीही वेळोवेळी सहकार्य दिले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील छायाचित्रकारांनी चरित्रनायकाची उपयुक्त भरलेली छायाचित्रे दिली. त्याबद्दल मी त्या शाखेबद्दल आभारी आहे.

श्री. केशवराव खु. चौधरी, निदेशक, भारत भारती मुद्रणालय, मुंबई यांनी जातीनिशी लक्ष घालून पुस्तकाची सुबक छपाई थोड्या कालावधीत करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

वरील सर्व सज्जनांच्या मदतीचा उल्लेख करतानाही प्रस्तुत चरित्रात राहिलेल्या उणिवांची मला जाणीव आहे. त्या सर्व उणिवा व्यक्तिशः माझ्या असून त्याबद्दल या चरित्राचे वाचक उदार अंतःकरणाने मला क्षमा करतील अशी मला आशा आहे.

– पंडितराव पाटील

मुंबई
दि. २७ जून १९७५
बांदा पूर्व, मुंबई–५१.

There are no reviews for this eBook.

0
0 out of 5 (0 User reviews )

Add a Review

Your Rating *
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in

Related eBooks