Balbharati (इयत्ता पहिली)

(0 User reviews)   143
By Krishna Admin Posted on Feb 27, 2026
In Category - Education
Umesh Raghunath Khose 2017
42 बंजारा भाषा
विषय : "इयत्ता पहिलीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाचा बंजारा भाषेत अनुवाद " निर्मिती :श्री. खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक) जि. प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता.उमरगा जि. उस्मानाबाद

महाराष्ट्र राज्य हे विविधतेने नटलेले राज्य आहे. महाराष्ट्रात विविध जिल्हामध्ये प्राकृतिक
विविधता आढळते. तसेच जाती धर्म पंथ, वेशभूषा, भाषा, राहणीमान यातही विविधता आढळते. यातच तांडा, वाडी, वस्त्यावर लमाण हि जात आढळून येते. त्यांची बोलीभाषा, राहणीमान, परंपरा यात कमालीचे वेगळेपण आहे.


लहान मुल शाळेत दाखल होण्याअगोदर ते आपल्या घरातील माणसाकडून भाषा व व्यवहार
शिकत असते. घरातच ते ऐकायला, बोलायला शिकते. मोठी माणस त्याला भाषा शिकायला मदत करत असतात. हे त्याच अनौपचारिक शिक्षण झाले. जेंव्हा मुल शाळेत दाखल होत तेव्हा त्याच
औपचारिक शिक्षण सुरु होते.


याप्रमाणेच मी २००७ साली एका तांड्यावर शिक्षक म्हणून रुजू झालो.तेंव्हा मला अस
जाणवलं कि, लमाण या समाजाची बोली भाषा, वेशभूषा व परंपरा वेगळ्या आहेत. अशातच
माझ्या शाळेचे गाव बेळब तांडा ता. उमरगा जि.उस्मानाबाद हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर आहे.
त्यामुळे येथे मुख्यत लमाणी व कन्नड भाषा बोलली जाते. यामुळे शाळेत इयत्ता पहिलीमध्ये
येणारे मुल केवळ लमाणी भाषा शिकलेले असते. याचा परिणाम असा जाणवू लागला कि मुलांना
शिकण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे उपस्थिती व गुणवत्ता यात खूप अडचणी येत आहेत.


यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी अस ठरवलं कि, आपण लमाणी भाषा शिकायची. सर्वांनी
प्रथमत लमाणी भाषा शिकून घेतली. यामुळे आम्हाला मुलांना समजून घेता येवू लागले व
त्यांच्या अडचणी सोडवता येवू लागल्या. मग पालकांना समजावून शिक्षणच महत्व समजून दिल.
याचा परिणाम असा झाला कि शाळा लोकवाट्यातून ई-लर्निंग व डिजिटल झाली. कारण बोली
भाषेबरोबरच आम्ही तंत्रज्ञान आत्मसात करून मुलांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न
करत आहोत. याचा परिणाम असा झाला कि, शाळेत १००% उपस्थिती राहते व शाळा १००%
प्रगत आहे.


महाराष्ट्रात अशाच वेगवेगळ्या जिल्ह्यात तांडा, वाडी, वस्त्यावर काम करणाऱ्या शिक्षक
बांधवाना या शिक्षक मार्गदर्शिकेचा व शब्द संग्रहाचा अध्यापन व अध्ययनात याचा नक्कीच
फायदा होईल असा मला विश्वास आहे.


!! धन्यवाद !!

श्री. खोसे उमेश रघुनाथ (मो.नं.९७६४४१२५०१)
जिल्हा परिषद, उस्मानाबाद

There are no reviews for this eBook.

0
0 out of 5 (0 User reviews )

Add a Review

Your Rating *
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in

Related eBooks